अर्जदाराने व्यवसायिक कर्ज अर्जासोबत पुढील योग्य कागदपत्राची पुर्तता केली पाहीजे
- अर्जदार नोकरीस असेल तर
- मागील तीन महिन्यांच्या साक्षांकित केलेल्या पगार स्लिपा पगार दाखला नेमणुकीबाबतचे पत्र नेमणुकीत कायम झाल्याचे पत्र संबधीत ऑफिसचे पगार कपातीचे हमीपत्र एक फोटो व पॅन कार्ड झेरॉक्स कॉपी बॅक स्टेटमेंट मागील एक वर्षाचे
- अर्जदार यांचा रहीवासी पुरावा.( रेशनिंग कार्ड निवडणूक ओळखपत्र टेलीफोन बील वीज बील आधार कार्ड भाडे करारनामा) यापैकी दोन
- बॅक खात्याचे संस्थेच्या नावे दहा चेक अर्जदार यांचे स्वहस्ताक्षरात सही केलेले.
- शासकीय नियमाप्रमाणे स्टॅम्पपेपर
- अर्जदार व्यावसायीक असेल तर
- शॉप अॅक्ट लायसन्स झेरॉक्स एस.एस.आय.लायसेन्स झेरॉक्स उत्पन्नाचे प्रतीज्ञा पत्र मागील तीन वर्षाची आर्थिक पत्रके नफातोटा पत्रक व ताळेबंदपत्रक आयकर भरणा पत्रक इत्यादीएक फोटो व पॅन कार्ड झेरॉक्स कॉपीबॅक स्टेटमेंट मागील एक वर्षाचे
- व्यवसाय भागीदारीत असल्यास पार्टनशिप डिड व पार्टनर एन.ओ.सी
- बॅक खात्याचे संस्थेच्या नावे दहा चेक अर्जदार यांचे स्वहस्ताक्षरात सही केलेले.
- अर्जदार यांचा रहीवासी पुरावा.( रेशनिंग कार्ड निवडणूक ओळखपत्र टेलीफोन बील वीज बील आधार कार्ड भाडे करारनामा) यापैकी दोन
- सदर कर्जासाठी दोन सक्षम जामीनदार आवश्यक
- जामीनदार नोकरदार असल्यास मागील तीन महिण्यांच्या साक्षांकित केलेल्या पगार स्लिपा पगार दाखला नेमणुकीबाबतचे पत्र नेमणुकीत कायम झाल्याचे पत्र संबधीत ऑफिसचे पगार कपातीचे हमीपत्र एक फोटो व पॅन कार्ड झेरॉक्स कॉपी
बॅक स्टेटमेंट मागील एक वर्षाचे
- जामीनदार व्यावसायीक असल्यास शॉप अॅक्ट लायसन्स झेरॉक्स एस.एस.आय.लायसेन्स झेरॉक्स उत्पन्नाचे प्रतीज्ञा पत्र मागील तीन वर्षाची आर्थिक पत्रके नफातोटा पत्रक व ताळेबंदपत्रक आयकर भरणा पत्रक इत्यादीएक फोटो व पॅन कार्ड झेरॉक्स कॉपीबॅक स्टेटमेंट मागील एक वर्षाचे
- व्यवसाय भागीदारीत असल्यास पार्टनशिप डिड व पार्टनर एन.ओ.सी.
- जामीनदार यांचा रहीवासी पुरावा.( रेशनिंग कार्ड निवडणूक ओळखपत्र टेलीफोन बील वीज बील आधार कार्ड भाडे करारनामा) यापैकी दोन
- नवीन वाहन घ्यावयाचे असेल तर
- त्याचे कोटेशन जोडले पाहिजे व कोटेशनच्या २५ रक्कम बचत खात्यावर जमा केले पाहीजे. सोबत बुकींग जमा चलन जोडने आवश्यक आहे.
- वाहनाचा फोटो वाहनाचे परमीट आर सी बुक टॅक्स बुक विमापॉलीसी व आर टी ओ वाहन ट्रान्फर करणे संबधीची जरूर ती सर्व कागदपत्रे (टी टी फॉर्म सेट) व गाडीची एक चावी टॅक्स इनव्हाईस डेबीट नोट पि.यु.सी फॉर्म नं.१७ संस्थेकडे जमा करणे आवश्यक आहे.
- कर्ज घेतल्यानंतर ३० दिवसाचे आत वाहन प्रत्यक्ष संस्थेस दाखविणे व त्यावर संस्थेचे नांव घालणे आवश्यक आहे.आर सी बुकावर व विमा पॉलिसीवर संस्थेचा बोजा नोंद करून आणण्याची जबाबदारी कर्जदार यांची राहील.
- आवश्यक वाटल्यास या कर्जासाठी स्थावर तारण घेतले जाईल.
- वाहनाची खरेदी पावती ही संस्था व कर्जदार यांचे सयुक्त नावे असली पाहिजे.
- मिळकतीतील हिस्सेदार यांना सहकर्जदार मान्यतादार म्हणुन समाविष्ट केले पाहिजे.
- वाहनाच्या कर्जाची रक्कम पुर्ण फिटेपर्यत कर्जदाराने विमा उतरविला पाहिजे.विमा कर्जदार व संस्थेच्या सयुक्त नावाने उतरवायचा आहे.मुदत संपण्यापुर्वी विम्याचे नुतनीकरण कर्जदाराने केले पाहिजे.कर्जदाराने विम्याचे नुतनीकरण न केल्यास संस्था नुतनीकरण करून घेऊन भरलेली विमा रक्कम कर्जदाराचे कर्ज खात्यात नावे टाकली जाईल व अशी रक्कम कर्ज समजुन त्यावर व्याज आकारण्यात येईल.विम्याचे नुतनीकरण न केल्यामुळे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी संस्थेवर राहणार नाही.संस्थेने विम्याचे नुतनीकरण वेळेत केले नाही अशी सबब कर्जदारास करता येणार नाही.
- जुने वाहन घ्यावयाचे असेल तर
- खरेदी पावती वाहनाचा फोटो फिटनेस सर्टिफिकेट मिटर टेस्टींग रिपोर्ट वाहनाचा मुल्यांकन दाखला खरेदी करारनामा वाहनाचे परमीट आर सी बुक टॅक्स बुक विमापॉलीसी व आर टी ओ वाहन ट्रान्फर करणे संबधीची जरूर ती सर्व कागदपत्रे (टी टी फॉर्म सेट) व गाडीची एक चावी पि.यु.सी फॉर्म नं.१७ संस्थेकडे जमा करणे आवश्यक आहे.
- आर सी बुक(स्मार्ट कार्ड) व विमा पॉलिसीवर आणि परमीटवर संस्थेचा बोजा नोंद करून आणण्याची जबाबदारी कर्जदार यांची राहील.