अर्जदाराने सोनेतारण कर्ज अर्जासोबत पुढील योग्य कागदपत्राची पुर्तता केली पाहीजे
- अशा प्रकारचे कर्ज केवळ व्यावसायीक सभासदांना मिळेल.
- शॉप अॅक्ट लायसन्स झेरॉक्स एस.एस.आय.लायसेन्स झेरॉक्स उत्पन्नाचे प्रतीज्ञा पत्र मागील तीन वर्षाची आर्थिक पत्रके नफातोटा पत्रक व ताळेबंदपत्रक आयकर भरणा पत्रक इत्यादीएक फोटो व पॅन कार्ड झेरॉक्स कॉपीबॅक स्टेटमेंट मागील एक वर्षाचे
- व्यवसाय भागीदारीत असल्यास पार्टनशिप डिड व पार्टनर एन.ओ.सी
- बॅक खात्याचे संस्थेच्या नावे दहा चेक अर्जदार यांचे स्वहस्ताक्षरात सही केलेले.
- अर्जदार यांचा रहीवासी पुरावा.( रेशनिंग कार्ड निवडणूक ओळखपत्र टेलीफोन बील वीज बील आधार कार्ड भाडे करारनामा) यापैकी दोन
- अशा कर्जाची मुदत १२ महिने राहील.१२ महिन्यानंतर अशा कर्जाचे सभासदाने नुतनीकरण करून घेणे आवश्यक आहे
- अशा कर्जास व्यवसायातील मालसाठा /फर्निचर/ जंगम मालमत्ता इ. प्रमुख तारण आणि स्थावर मालमत्ता पुरक तारण म्हणुन देता येईल.रू.१ लाखापावेतोच्या कर्जाला पुरक तारणाची आवश्यकता नाही.
- या तारणाशिवाय कर्जदाराला दोन सक्षम जामीनदार दयावे लागतील.
- अशा स्वरूपाचे कर्ज जास्तीत जास्त रू.५ लाख मिळेल.
- या कर्जखातेवर ऊचल करतांना ऊचल रक्कमेच्या दुप्पट रक्कमेचा मालसाठा /फर्निचर/जंगम मालमत्ता कर्जदाराकडे असणे आवश्यक आहे.
- कर्जदाराने दरमहा अखेरच्या साठयाची माहिती संस्थेने ठरवून दिलेल्या नमुन्यात पुढील महिन्याच्या ५ तारखेपर्यत दिली पाहिजे.
- संस्थेकडे तारण असलेल्या मालाचा/मालमत्तेचा संस्था व कर्जदार यांचे सयुक्त नावाने विमा ऊतरविला पाहिजे सदर विमा संस्था ऊतरविल व हप्ता रक्कम कर्ज खातेस नावे टाकला जाईल.
- अशा प्रकारे तारण असलेल्या मालाची संस्था केव्हाही तपासणी करेल.
- कर्जदार यांचा मालसाठा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी संस्थेचा नामफलक लावणे
कर्जदार यांचेवर बंधनकारक राहील.
- कर्जदारास जी मर्यादा मंजुर झालेली आहे त्या मंजुर रक्कमेवर दरमहा किमान तीनपट व्यवहार खात्यावर होणे आवश्यक आहे.
- अशा कर्ज खातेवर दरमहा पद्धतीने व्याज आकारणी होईल सदर व्याजाची रक्कम आकारणी झाल्यापासुन १० दिवसाचे आत कर्जदाराने या खात्यावर भरणे आवश्यक आहे.
- अशा कर्जखातेवर द.सा.द.शे.१६ दराने व्याज आकारणी केली जाईल.
- ज्या महिन्यामध्ये कर्जबाकी ही मालसाठयाच्या किंमतीच्या प्रमाणात नसेल त्या महिन्यासाठी ३ दराने दंडव्याज आकाराणी केली जाईल.
- या नियमात बदल करण्याचा वाढवण्याचा अपवाद करण्याचा अधिकार संस्थेस राहील.
- या खात्यासाठी संस्थेने पुरविलेल्या चेकनेच व्यवहार केले पाहिजेत.अशा चेकचा व्यवहार रोखीने होईल.याबाबत स्वतंत्रपणे अधिकार पत्र लिहुन दयावे लागेल.
- इतर नियम व अटी
- मिळकतीतील हिस्सेदार यांना सहकर्जदार मान्यता देणार म्हणून समाविष्ठ करण्यात येईल.
- अर्जदाराचा नोकरीचा कालावधी किती वर्षे शिल्लक आहेत यांवर कर्जपरतफेड कालावधी अवलंबून राहील.
- सर्व हप्ते नियमित परतफेड केल्यास एकूण व्याजाच्या रकमेवर १ सवलत देण्यात येईल.
- सभासदाने कर्ज घेतलेनंतर त्याचा मासिक हप्ता भरला नाही तर थकीत हप्त्यांवर ३ जादा व्याजाची आकारणी करण्यात येईल.आणि असे सलग तीन मासिक हप्ते भरले नाहीत तर अशा कर्जदार सभासदावर म.स.सं.१९६० चे कलम १०१ अन्वये तसेच कलम १३८ अंतर्गत कारवाई करण्यात येईल.
- विम्याबाबत संस्थेच्या अटी बंधनकारक राहतील.