वैयक्तीक जामीनकी कर्जाची मर्यादा रक्कम रू.एक लाखापर्यत राहील. कर्ज उद्देश विचारात घेवून सदर कर्ज मंजुर रकमेचा परतफेड कालावधी जास्तीत जास्त ६० महिन्याचा राहील. रक्कम रू.५००० ते ५०००० हजार पर्यत कालावधी ३६ महिने व रक्कम रू.५०००१ ते १ लाख पर्यत कालावधी ६० महिन्याचा राहील.
सदर मंजुर कर्जाच्या कर्जाचा व्याजदर हा १६% इतका राहील. मंजुर कर्जाच्या ५% शेअर्स कपात करण्यात येईल सदरची रक्कम आपल्या शेअर्सखात्यात जमा राहील.
मंजुर कर्जाच्या सर्व्हीस चार्ज १% व जास्तीत जास्त रू.१५०००, मंजुर कर्जाच्या इमारत निधी १/२% व जास्तीत जास्त १००००/- इ. प्रमाणे प्रोसेस फी रोख भरावी लागेल. कर्ज रोखा फ्रॅकींग रू.१००/-
अर्जदाराने व्यक्गीत जामीनकी अर्जासोबत पुढील योग्य कागदपत्राची पुर्तता केली पाहीजे
- अर्जदार नोकरीस असेल तर
- मागील तीन महिन्यांच्या साक्षांकित केलेल्या पगार स्लिपा पगार दाखला नेमणुकीबाबतचे पत्र नेमणुकीत कायम झाल्याचे पत्र संबधीत ऑफिसचे पगार कपातीचे हमीपत्र एक फोटो व पॅन कार्ड झेरॉक्स कॉपी बॅक स्टेटमेंट मागील एक वर्षाचे
- अर्जदार यांचा रहीवासी पुरावा. ( रेशनिंग कार्ड निवडणूक ओळखपत्र टेलीफोन बील वीज बील आधार कार्ड भाडे करारनामा) यापैकी दोन
- बॅक खात्याचे संस्थेच्या नावे दहा चेक अर्जदार यांचे स्वहस्ताक्षरात सही केलेले.
- शासकीय नियमाप्रमाणे स्टॅम्पपेपर
- अर्जदार व्यावसायीक असेल तर
- शॉप अॅक्ट लायसन्स झेरॉक्स एस.एस.आय.लायसेन्स झेरॉक्स उत्पन्नाचे प्रतीज्ञा पत्र मागील तीन वर्षाची आर्थिक पत्रके नफातोटा पत्रक व ताळेबंदपत्रक आयकर भरणा पत्रक इत्यादीएक फोटो व पॅन कार्ड झेरॉक्स कॉपीबॅक स्टेटमेंट मागील एक वर्षाचे
- व्यवसाय भागीदारीत असल्यास पार्टनशिप डिड व पार्टनर एन.ओ.सी
- बॅक खात्याचे संस्थेच्या नावे दहा चेक अर्जदार यांचे स्वहस्ताक्षरात सही केलेले.
- अर्जदार यांचा रहीवासी पुरावा.( रेशनिंग कार्ड निवडणूक ओळखपत्र टेलीफोन बील वीज बील आधार कार्ड भाडे करारनामा) यापैकी दोन
- सदर कर्जासाठी दोन सक्षम जामीनदार आवश्यक
- जामीनदार नोकरदार असल्यास मागील तीन महिण्यांच्या साक्षांकित केलेल्या पगार स्लिपा पगार दाखला नेमणुकीबाबतचे पत्र नेमणुकीत कायम झाल्याचे पत्र संबधीत ऑफिसचे पगार कपातीचे हमीपत्र एक फोटो व पॅन कार्ड झेरॉक्स कॉपीबॅक स्टेटमेंट मागील एक वर्षाचे
- जामीनदार व्यावसायीक असल्यास शॉप अॅक्ट लायसन्स झेरॉक्स एस.एस.आय.लायसेन्स झेरॉक्स उत्पन्नाचे