गृह तारण कर्जाची मर्यादा रक्कम रू.४० लाखापर्यत राहील. कर्ज मर्यादा स्थावर मुल्यांकनाच्या ७५% इतके कर्ज मंजुर होईल. तसेच जुन्या स्थावर मिळकतीवरती कर्ज हवे असल्यास स्थावर मुल्यांकनाच्या ५०% इतके कर्ज मंजुर होईल.नोंदणी गहाणखत खर्च कर्ज मंजुर रकमेच्या २% इतका राहील.
सदर कर्जाचा व्याजदर हा बदलता व्याजदर १५% राहील. मंजुर कर्जाच्या २.५% शेअर्स कपात करण्यात येईल सदरची रक्कम आपल्या शेअर्सखात्यात जमा राहील. सर्व्हीस चार्ज १ व जास्तीत जास्त रू.१५०००/- इमारत निधी १/२% व जास्तीत जास्त रू.१०००० इ.प्रमाणे प्रोसेस फी रोख भरावी लागेल.कर्ज रोखा फ्रॅकींग प्रती लाख रू.१००/- प्रमाणे अर्जदार यांनी करून दयावयाचा आहे. तसेच वकील फी मंजुर कर्ज रकमेच्या प्रमाणत राहील
अर्जदाराने वाहन तारण कर्ज अर्जासोबत पुढील योग्य कागदपत्राची पुर्तता केली पाहीजे
- अर्जदार नोकरीस असेल तर
- मागील तीन महिन्यांच्या साक्षांकित केलेल्या पगार स्लिपा पगार दाखला नेमणुकीबाबतचे पत्र नेमणुकीत कायम झाल्याचे पत्र संबधीत ऑफिसचे पगार कपातीचे हमीपत्र एक फोटो व पॅन कार्ड झेरॉक्स कॉपी बॅक स्टेटमेंट मागील एक वर्षाचे
- अर्जदार यांचा रहीवासी पुरावा.( रेशनिंग कार्ड निवडणूक ओळखपत्र टेलीफोन बील वीज बील आधार कार्ड भाडे करारनामा) यापैकी दोन
- बॅक खात्याचे संस्थेच्या नावे दहा चेक अर्जदार यांचे स्वहस्ताक्षरात सही केलेले.
- शासकीय नियमाप्रमाणे स्टॅम्पपेपर
- अर्जदार व्यावसायीक असेल तर
- शॉप अॅक्ट लायसन्स झेरॉक्स एस.एस.आय.लायसेन्स झेरॉक्स उत्पन्नाचे प्रतीज्ञा पत्र मागील तीन वर्षाची आर्थिक पत्रके नफातोटा पत्रक व ताळेबंदपत्रक आयकर भरणा पत्रक इत्यादीएक फोटो व पॅन कार्ड झेरॉक्स कॉपीबॅक स्टेटमेंट मागील एक वर्षाचे
- व्यवसाय भागीदारीत असल्यास पार्टनशिप डिड व पार्टनर एन.ओ.सी
- बॅक खात्याचे संस्थेच्या नावे दहा चेक अर्जदार यांचे स्वहस्ताक्षरात सही केलेले.
- अर्जदार यांचा रहीवासी पुरावा.( रेशनिंग कार्ड निवडणूक ओळखपत्र टेलीफोन बील वीज बील आधार कार्ड भाडे करारनामा) यापैकी दोन
- सदर कर्जासाठी दोन सक्षम जामीनदार आवश्यक
- जामीनदार नोकरदार असल्यास मागील तीन महिण्यांच्या साक्षांकित केलेल्या पगार स्लिपा पगार दाखला नेमणुकीबाबतचे पत्र नेमणुकीत कायम झाल्याचे पत्र संबधीत ऑफिसचे पगार कपातीचे हमीपत्र एक फोटो व पॅन कार्ड झेरॉक्स कॉपी
बॅक स्टेटमेंट मागील एक वर्षाचे
- जामीनदार व्यावसायीक असल्यास शॉप अॅक्ट लायसन्स झेरॉक्स एस.एस.आय.लायसेन्स झेरॉक्स उत्पन्नाचे प्रतीज्ञा पत्र मागील तीन वर्षाची आर्थिक पत्रके नफातोटा पत्रक व ताळेबंदपत्रक आयकर भरणा पत्रक इत्यादीएक फोटो व पॅन कार्ड झेरॉक्स कॉपीबॅक स्टेटमेंट मागील एक वर्षाचे
- व्यवसाय भागीदारीत असल्यास पार्टनशिप डिड व पार्टनर एन.ओ.सी.
- जामीनदार यांचा रहीवासी पुरावा.( रेशनिंग कार्ड निवडणूक ओळखपत्र टेलीफोन बील वीज बील आधार कार्ड भाडे करारनामा) यापैकी दोन
- सदर कर्जास कर्ज उद्देश स्पष्ट करणारे पुरावे जोडणे आवश्यक आहे.
अ) नवीन फ्लॅट खरेदी
- अपार्टमेंटच मूळ जागामालक आणि बिल्डर यांचेतील कराराची प्रत ( डेव्हलपमेंट अॅग्रीमेंट)
- प्रापर्टीचे मागील तेरा वर्षाचा सर्च रिपोर्ट
- बिल्डींग बांधकाम परवाना एन.ए.सर्टीफिकेट व प्लॅन कॉपी मंजुर नकाशा यु एल सी दाखला
- फ्लॅट चे सेल डीड किंवा करार नामा सोसायटी एन ओ सी भाग दाखला ताबा पत्र बुकींग रिसीट बिल्डर डिमांड पत्र
- अर्जदारास तो खरेदी करणार असलेल्या फ्लॅटचे रजिस्टर गहाणखत करावे लागेल.
- अर्जदार खरेदी करणार असलेल्या फ्लॅटचे बांधकाम चालू असल्यास त्यास मागणीनुसार संस्था त्यास टप्प्याने कर्ज रक्कम अदा करेल फ्लॅटचे ओटा लेवल बांधकाम झाल्यास २५ रक्कम स्लॅब लेवल पर्यत बांधकाम झाल्यास २५ रक्कम
फिनिशिंगसाठी २५ रक्कम व उर्वरीत रक्कम पुर्णत्वाचा दाखला सादर केल्यानंतर
- बिल्डरचे फ्लॅटवर बोजा नोंद करणेबद्दल ना हरकत प्रमाणपत्र
- बांधकाम स्कीम अन्य बॅकेने टेक ओव्हर केलेली असल्यास (प्रोजेक्ट लोन) टायपार्टी अॅग्रीमेंट
- गुंठेवारी स्कीम मधील फ्लॅट असल्यास गुंठेवारी दाखला व नकाशा फी भरल्याची पावती झोन दाखला व नकाशा मुळ मालक सातबारा उतारा
ब) जुना फ्लॅट खरेदी
- मूळ फ्लॅट मालक आणि बिल्डर यांचे समवेत झालेल्या कराराची प्रत
- बांधकाम पुर्णत्वाचा दाखलाफ्लॅट चे सेल डीड किंवा करार नामा सोसायटी एन ओ सी भाग दाखला ताबा पत्र
- बिल्डींग बांधकाम परवाना व एन.ए.सर्टीफिकेट ब्लु प्रिंट व यु एल सी दाखला
- फ्लॅट चालू आर्थिक वर्षाचा कर भरल्याची पावती व विजबिल
- अर्जदारास तो खरेदी करणार असलेल्या फ्लॅटचे नोंदणीकृत गहाणखत शोध अहवाल व मुल्यांकन करावे लागेल.
- अर्जदारास फ्लॅट खरेदी करताना पुढीलप्रमाणे कर्जवाटप करण्यात येईल
फ्लॅट खरेदी करार करतांना ५० रक्कम
फ्लॅट खरेदी कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर ५०
क) मोकळया जागेवरील बांधकाम करणेसाठी
- मोकळया जागेचे मुळ खरेदीखत खरेदीपावती इंडेक्स चालु तारखेचा ७१२ उतारा
- प्रापर्टीचे मागील तेरा वर्षाचा सर्च रिपोर्ट
- आर्कीटेक्ट प्लॅन इस्टिमेट
- बांधकाम परवाना एन.ए.सर्टीफिकेट किंवा गुंठेवारी दाखला नकाशा फी भरल्याची पावती झोन दाखला व नकाशा सीटी सर्व्हे उतारा
- अर्जदारास तारण देणाया मिळकतीचे शोध अहवाल मुल्यांकननोंदणीकृत गहाणखत करून ७१२ उतायावर कर्ज रकमेचा बोजा चढवून दयावा लागेल व कर्जाची परतफेड पुर्ण झाल्यानंतर रिलीज डिड ७१२ उतायावरील बोजा नोंदा रद्द करून घ्यावी लागेल.
- अर्जदार बांधकाम करतांना पुढील टप्यात कर्जवाटप करण्यात येईल.
घराचे ओटा लेवल बांधकाम झाल्यास २५ रक्कम
स्लॅब लेबल पर्यत बांधकाम झाल्यास २५ रक्कम
फिनिशिंगसाठी २५ रक्कम
घराचे पुर्ण बांधकाम झालेनंतर संबधीत अधिकायाची व्हिजीट झालेनंतर २५ रक्कम
ड) जुने घर घेण्यासाठी
- मूळ घरमालकाचे जागेचे मुळ खरेदीखत खरेदीपावती इंडेक्स चालू तारखेचा ७१२ उतारा.
- प्रापर्टीचे मागील तेरा वर्षाचा सर्च रिपोर्ट
- घराचा प्रॉपर्टी उतारा पाणीपटटी करभरल्याची पावती विजबिल इत्यादी
- बांधकाम परवाना एन.ए.सर्टीफिकेट किंवा गुंठेवारी दाखला नकाशा फी भरल्याची पावती झोन दाखला व नकाशा सीटी सर्व्हे उतारा कर आकारणी यादी
- अर्जदारास तारण देणाया मिळकतीचे शोध अहवाल मुल्यांकननोंदणीकृत गहाणखत करून ७१२ उतायावर कर्ज रकमेचा बोजा चढवून दयावा लागेल व कर्जाची परतफेड पुर्ण झाल्यानंतर रिलीज डिड ७१२ उतायावरील बोजा नोंदा रद्द करून घ्यावी लागेल.
- मुळ घरमालकाच्या व कर्जदार यांचा खरेदी करारनामा साठेखत विसारपावती इत्यादी अर्जदारास घर खरेदी करतांना पुढीलप्रमाणे कर्जवाटप करण्यात येईल.
घर खरेदी करार करतांना ५० रक्कम
घर खरेदी कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर ५०